८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उद्घाटन समारंभ संपन्न

८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उद्घाटन समारंभ संपन्न

*कोंकण एक्सप्रेस*

*८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उद्घाटन समारंभ संपन्न*

*वैभववाडी : संजय शेळके*

८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मराठी, हिंदी आणि इंग्रजी विभाग आणि आयक्युएसी यांच्या संयुक्त विद्यमाने PM-USHA अंतर्गत “मराठी, हिंदी आणि इंग्रजी साहित्यातील स्त्री चित्रण आणि सक्षमीकरण” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उद्घाटन समारंभ स्थानिक समिती अध्यक्ष श्री. सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त श्री. शरदचंद्र रावराणे, परिषदेच्या बीजभाषक प्रा. डॉ. स्नेहा महांबरे- गोवा, इंग्रजी विषयतज्ञ प्रा. डॉ. अरुंधती पवार- कोल्हापूर, मराठी विषयतज्ञ प्रा. डॉ. विनायक बापट- गोवा, हिंदी विषयतज्ञ प्रा. डॉ. विद्या शिंदे- खेड रत्नागिरी, प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, उपप्राचार्य डॉ. एम. आय. कुंभार, आयक्यूएसी समन्वयक डॉ.डी.एम.शिरसट, पी.एम.उषा समन्वयक प्रा.डॉ.के‌.पी.पाटील, परिषदेच्या समन्वयक प्रा. डॉ. व्ही.सी.काकडे, सचिव प्रा.ए.एम.कांबळे उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि आनंदीबाई रावराणे यांच्या प्रतिमा पूजनाने आणि रोपट्याला जलार्पण करून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
या राष्ट्रीय परिषदेच्या बीजभाषक प्रा. डॉ. स्नेहा महांबरे यांनी मराठी साहित्यातील स्त्री चित्रणाचा आढावा घेताना संत साहित्य ते आधुनिक साहित्य असा आढावा घेत अनेक घटकांवर प्रकाश टाकला. कष्टकरी ग्रामीण स्त्री आणि लोक परंपरा यावरही भाष्य केले. ज्यामध्ये स्त्रीचे उदात्तीकरण आहे आणि अबलाकरण केले आहे. मात्र वास्तव यापासून वेगळे आहे असे प्रतिपादन केले. अशा त्रिभाषीक परिषदांमधून विचार विनिमय होऊन प्रगतीला चालना मिळण्यास मदत मिळते असे अध्यक्षीय भाषणात श्री.सज्जनकाका रावरणे यांनी सांगितले.
या परिषदेच्या इंग्रजी विषयतज्ञ म्हणून इंग्रजी साहित्याच्या अभ्यासक डॉ.अरुंधती पवार यांनी इंग्रजी साहित्यातील स्त्री चित्रण आणि भारतीय इंग्रजी साहित्यातील स्त्री चित्रण यावर प्रामुख्याने प्रकाश टाकला. तर हिंदी साहित्याच्या विषयतज्ञ म्हणून प्रा. डॉ. विद्या शिंदे यांनी हिंदी साहित्यातील कालखंड आणि त्यामध्ये येणारे स्त्री चित्रण यावर प्रकाश टाकत आधुनिक काळातील वास्तवावर भाष्य केले. मराठी विषयाचे विषयतज्ञ म्हणून प्रा. डॉ. विनायक बापट यांनी साहित्याचा परामर्श घेतानाच वास्तवातील अनेक विसंगतीवर बोट ठेवत, प्रामुख्याने झालेले बदल आणि अपेक्षित बदल यावर सूचन केले.
दुपारच्या सत्रामध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयातील प्राध्यापक व संशोधक यांनी शोधनिबंध सादर केले. परिषदेच्या समारोप सत्रामध्ये अध्यक्षीय भाषणातून श्री. शरदचंद्र रावराणे यांनी अशा परिषदांच्या विचार मंथनातून बदल होतील. तेव्हाच सामाजिक बदल होतील अशी आशा व्यक्त करीत समाधान व्यक्त केले.
या परिषदेमध्ये महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील प्राध्यापक व संशोधक मिळून ९५ प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.ए.एम.एम कांबळे व प्रा.डी.एस बेटकर यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजीवनी पाटील व प्रा.निलेश कारेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!