*नाद–महाळुंगे रस्त्याचे संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपूजन*

*नाद–महाळुंगे रस्त्याचे संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपूजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*नाद–महाळुंगे रस्त्याचे संदीप साटम यांच्या हस्ते भूमिपूजन*

*शिरगाव :  संतोष साळसकर*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांच्या माध्यमातून देवगड तालुक्यातील नाद ते महाळुंगे हा ३ कि.मी. लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. या प्रकल्पासाठी ५ कोटी ५० लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.या रस्त्याचे भूमिपूजन भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. संदीप साटम यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी पडेल मंडल अध्यक्ष महेश उर्फ बंड्या नारकर, मंगेश लोके, मिलिंद साटम, सरपंच प्रवीण पाष्टे, उपसरपंच मंगेश तेली, ग्रामपंचायत सदस्य सुरेश गुरव, मयुरी तांबे, विजय तेली, अण्णा परब, काका बाणे, इंद्रजित आंग्रे, मारुती गराटे, दिलीप मटकर तसेच भाजपा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी होती. अखेर पालकमंत्री ना. नितेशजी राणे यांच्या पाठपुराव्याने हा रस्ता मंजूर होऊन प्रत्यक्ष काम सुरू होत असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!