*कुमार दुर्गेश परेश बिडये याने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतली जाणारी युजीसी-नेट (UGC -NET ) परीक्षा यशस्विरित्या उत्तीर्ण*

*कुमार दुर्गेश परेश बिडये याने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतली जाणारी युजीसी-नेट (UGC -NET ) परीक्षा यशस्विरित्या उत्तीर्ण*

*कोंकण एक्सप्रेस*

*कुमार दुर्गेश परेश बिडये याने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतली जाणारी युजीसी-नेट (UGC -NET ) परीक्षा यशस्विरित्या उत्तीर्ण*

*फोंडाघाटत  सर्वत्र कौतुकाचा वर्षाव  होत आहे*

*फोंडाघाट : प्रतिनिधि*

फोंडाघाटचा रहिवासी कुमार दुर्गेश परेश बिडये याने भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतली जाणारी युजीसी-नेट (UGC -NET ) परीक्षा यशस्विरित्या उत्तीर्ण केली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये त्याने सोशल मेडिसिन आणि कम्युनिटी हेल्थ (Social Medicine and Community Health) या विषयावर लक्ष केंद्रित करून ही परीक्षा दिली होती. युजीसी-नेट (UGC -NET ) परीक्षा ही शैक्षणिक क्षेत्रात विशेषतः वैज्ञानिक विभागात अतिशय कठीण व उंचीची मानली जाते, यासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या तो जे. एस. एस. कॉलेज ऑफ फार्मसी, मैसूर, कर्नाटक -५७००१५, भारत याठिकाणी फार्मास्युटिकल सायन्सेस (Pharmaceutical Sciences) या विषयात पी. एच. डी. (Ph.D.) करत आहे. कुमार दुर्गेश याने या यशाचे श्रेय त्याचे प्रेरणा स्थान असणारे त्याचे आजोबा कै. श्री. शांताराम केशव बिडये (आबा बिडये), त्याचे आई-वडील श्री. परेश शांताराम बिडये आणि सौ. प्रणिता परेश बिडये तसेच त्याच्या सर्व गुरुजनांना प्रदान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!