सरकारी बँकांचे खाजगीकरण नको

सरकारी बँकांचे खाजगीकरण नको

*कोकण Express*

*सरकारी बँकांचे खाजगीकरण नको*

बँक कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप यशस्वी

युनियनच्या वतीने कणकवलीत निदर्शने

*कणकवली ः प्रतिनिधी*

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचा बँक खासगीकरणाला विरोध आहे. तरीदेखील शासनाकडून बँक खाजगीकरणाचे धोरण अवलंबले जात आहे.त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल,भविष्यात हे धोरण देशाच्या अर्थव्यवस्थेला घातक ठरेल. या विरोधात दोन दिवसीय संप पुकारण्यात आला होता. त्यानुसार बँक ऑफ महाराष्ट्र कणकवली शाखा येथे १६ मार्चला बँक युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आलीत. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या संपाला एसटी कर्मचारी संघटना,एमएसीबी वर्कर्स ऍण्ड फेडरेशन या संघटनांनी पाठिंबा दिला.

यावेळी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सचे अध्यक्ष संतोष रानडे,उज्ज्वला धानजी,बँक ऑफ इंडियाच्या मिताली पालव,संध्या मालवणकर,निखिल साटम,गौरव अग्रवाल,प्रणाली कडुलकर,श्रीमती मनीषा,साईबाबा काणेकर,श्रीमती गवाणकर, गणेश गावकर आदींसह बँक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बँक युनियन च्या वतीने मांडण्यात आलेले प्रमुख मुद्दे ,बँक खासगीकरण म्हणजे खेड्यातून कमीत कमी बँकिंग, शेतीला कमीत कमी कर्ज दिले जाईल. बेरोजगारांना कमीत कमी कर्ज, छोटा उद्योग , व्यापार याला कमीत कमी कर्ज धोरण असेल. कमीत कमी शैक्षणिक कर्ज , आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांना कमीत कमी कर्ज असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!