*दुंडागड ( चाफेड दुर्ग) चा महादरवाजा घेणार मोकळा श्वास*

*दुंडागड ( चाफेड दुर्ग) चा महादरवाजा घेणार मोकळा श्वास*

*कोंकण एक्सप्रेस*

*दुंडागड ( चाफेड दुर्ग) चा महादरवाजा घेणार मोकळा श्वास*

*मावळे आम्ही स्वराज्याचे महाराष्ट्र राज्य रजि. कणकवली विभागाची मोहीम*

*शिरगांव  : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील चाफेड येथील दुंडाच्या गडावर मावळे आम्ही स्वराज्याचे या टीमच्या कणकवली विभागाची आज ९ मार्च २०२५ रोजी चौथी मोहीम पार पडली. किल्ल्याचा कोसळलेला महादरवाजा मोकळा करणे हेच ध्येय या टीमच्या कणकवली विभागाचे आहे. २०२५ या वर्षभरात एकूण २५ मोहीमचे नियोजन या किल्ल्यासाठी आणि महादरवाजा मोकळा करण्यासाठी मावळे आम्ही स्वराज्याचे कणकवली विभागाने केलेलं आहे.

या मोहीम साठी या संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर, अनिकेत तर्फे, दत्ताराम अमृते, मयूर रांबाडे, पूनम पवार, रसिका चव्हाण, इत्यादी उपस्थित होते.


दुंडागड साठी मावळे आम्ही स्वराज्याचे कणकवली विभागाच्या पुढील मोहीम या तारखेला होणार आहेत. सहावी मोहीम – २३ मार्च , सातवी मोहीम – ६ एप्रिल, आठवी मोहीम २० एप्रिल, नववी मोहीम. -४ मे ,
दहावी मोहीम -१८ मे, अकरावी मोहीम १ जून, बारावी मोहीम -१५ जून, तेरावी मोहीम २९ जून, चौदावी मोहीम १३ जुलै,
पंधरावी मोहीम २७ जुलै, सोळावी मोहीम १० ऑगस्ट , सतरावी मोहीम २३ ऑगस्ट,
अठरावी मोहीम ७ सप्टेंबर,
एकोणिसावी मोहीम २१ सप्टेंबर, विसावी मोहीम ५ ऑक्टोबर, एकवीसावी मोहीम १९ ऑक्टोंबर, बावीसावी मोहीम २ नोव्हेंबर, तेहविसावी मोहीम १६ नोव्हेंबर, चोवीसावी मोहीम ३० नोव्हेंबर, पंचवीसावी मोहीम १४ डिसेंबर.


अशा प्रकारे मोहीम राबविण्यात येणार आहे यातील अनेक मोहिमांना उपस्थित राहावे अस आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुमित कुशे, जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर यांनी केलं आहे.
मावळे आम्ही स्वराज्याचे या शिवप्रेमी संस्थेने चाफेड येथील दुंडाचा गडावर पहिल्यांदा आले तेव्हा ते हा गड बघून खूपच भारावून गेले. चाफेड गावचे विद्यमान दिवंगत सरपंच किरण मेस्त्री यांनी या गडाचे संशोधन, उत्खनन आणि या गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने खऱ्या अर्थाने प्रयत्न केले. त्यांनी आपल्या अडीच वर्षाच्या सरपंच कालावधीत या गडावर विविध शिवप्रेमी संस्थेच्या मोहीम यशस्वीपणे राबविल्या. यात गणेश नाईक यांच्या दुर्ग मावळा या संस्थेने पण यात चांगल्या प्रकारे पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबवून गडाचे नामफलक लावले.

यानंतर मावळे आम्ही स्वराज्याचे या संस्थेने पुढाकार घेऊन या चालू वर्षात एकूण २५ मोहीम राबवून या गडाला खऱ्या अर्थाने जगासमोर आणण्याचे स्वप्न पाहिले आहे. त्यादृष्टीने त्यांची सकारात्मक पावले चालू आहेत. दिवंगत सरपंच किरण मेस्त्री यांनी या गडाविषयी पाहिलेले स्वप्न आम्ही गावच्या ग्रामस्थांच्या आणि ग्रामपंचायतीच्या सहकाऱ्याने नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असे या संस्थेचे जिल्हाध्यक्ष अनंत आचरेकर यांनी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!