तिथवली नानीवडे फाटा येथे गोवा बनावटीची दारू मुद्देमालस  जप्त 

तिथवली नानीवडे फाटा येथे गोवा बनावटीची दारू मुद्देमालस  जप्त 

कोंकण एक्सप्रेस 

तिथवली नानीवडे फाटा येथे गोवा बनावटीची दारू मुद्देमालस  जप्त 

वैभववाडी प्रतिनिधी

तिथवली नानीवडे फाटा येथे गोवा बनावटीची सुमारे ३ लाख २० हजाराची दारू सुमारे ४ लाखाचा टेम्पो असा ७ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक प्रवीण गणेशराम बिशनोई रा. पाली राज्य राजस्थान याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. वैभववाडी पोलिसांनी रविवारी सकाळी ही धडक कारवाई केली.
आगामी होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या सूचनेनुसार पोलीस राहुल तळस्कर, श्री.राजेंद्र शेळके, हरिचंद्र जायभाग यांनी खारेपाटण तो गगनबावडा मार्गावर तिथवली नानीवडे फाटा येथे नाकाबंदी केली होती. सकाळी ७.३० वा. सुमारास खारेपाटणहून तिथवलीच्या दिशेने येणारा टेम्पो पोलिसांनी थांबवला. त्याच्याकडे वाहन परवाना व टेम्पोची कागदपत्रे तपासली. यावेळी त्यांनी टेम्पोच्या हौद्याची तपासणी केली असता, गोवा बनावटीचे दारूचे बॉक्स आढळून आले. याबाबत पोलीस निरीक्षक अवसरमोल यांना माहिती देऊन दारूच्या बॉक्ससह टेम्पो वैभववाडी पोलीस ठाण्यात आणून रीतसर पंचनामा केला. यावेळी इम्पेरियल ब्लू नावाची गोवा बनावटीची दारुचे ७६ बॉक्स आढळून आले. सुमारे ३ लाख २० हजार किंमत आहे. तर दारू वाहतूक करण्यात येत असलेला सुमारे ४ लाख किंमतीचा टेम्पो सुद्धा जप्त करण्यात आला आहे. तर चालक बष्णोई यांच्यावर विनापरवाना दारू वाहतूक करत असले प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!