*त्रिंबक येथील कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रणिता राऊळ प्रथम*

*त्रिंबक येथील कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रणिता राऊळ प्रथम*

*कोंकण एक्सप्रेस*

*त्रिंबक येथील कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालयाच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रणिता राऊळ प्रथम*

*मालवण ः प्रतिनिधी*

कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्यावतीने घेण्यात आलेल्या कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धेत वेंगुर्ला येथील श्रीम. प्रणिता राऊळ यांनी प्रथम क्रमांक पटकाविला

कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय त्रिंबक यांच्यावतीने कै. दादा ठाकूर स्मृती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा नुकतीच जनता विद्यामंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न झाली. प्रारंभी कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकचे अध्यक्ष
श्री. सुरेंद्र सकपाळ यांनी प्रास्तविक करून स्वागत केले

या स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे..
प्रथम = श्रीम. प्रणिता राऊळ, वेंगुर्ला. द्वितीय = श्रीम. पूर्वा खाडिलकर, सावंतवाडी. तृतीय = श्री .संग्राम कासले, मालवण तर उत्तेजनार्थ श्री. रणजीत पाटील, देवगड व श्री. प्रसाद खडपकर, कुडाळ यावेळी विजेत्या स्पर्धकांना रोख स्वरूपाच्या रक्कमांसहित सन्मान चिन्हे पारितोषिक म्हणून देण्यात आली. उत्तेजनार्थ क्रमांकांना सन्मानचिन्हे देऊन तर सहभाग उत्तेजनार्थ म्हणुन सर्वश्री श्रीम. सायली म्हाडगुत, श्रीम. दिव्या परब, श्रीम. आशा मोहिते व श्री. सुजय जाधव यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोकण मराठी साहित्य परिषद मालवण अध्यक्ष श्री. सुरेश शामराव ठाकूर हे होते, वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन नगर वाचन मंदिर मालवणचे ग्रंथपाल श्री. संजय शिंदे, यांच्या हस्ते करण्यात आले.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा श्री. सुरेश ठाकूर यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री. गुरुनाथ ताम्हणकर व श्री.संजय शिंदे मालवण यांनी काम पाहिले.

कार्यक्रमासाठी एकनाथ गायकवाड श्री. अमेय लेले, ग्रंथपाल, श्री. बंडू जाधव, सहाय्यक ग्रंथपाल व श्रीम. चैताली सुतार यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!