*कोंकण एक्सप्रेस*
*त्रिंबक येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण तालुक्यातील त्रिबंक -देऊळवाडी येथे राहणाऱ्या रवींद्र संजय आपटे (वय 39) या तरुणाचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी घरातील पंख्यास गळफास लावलेल्या अवस्थेत आज सकाळी साडेसात सात वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे रविंद आपटे याने आत्महत्या केली असावी असा कयास आचरे पोलिसांनी व्यक्त केला असून याबाबत पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे
आचरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रवींद्र आपटे हा तरुण त्रिंबक देऊळवाडी येथे एकटाच राहत होता तो अविवाहित होता. नेहमी मानसिक तणावाखाली होता. सकाळी घराबाहेर तो नेहमीप्रमाणे दिसून न आल्याने शेजारील ग्रामस्थानी घरी येऊन पाहिले असता तो गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. सदर घटनेची माहिती शेजारील ग्रामस्थांनी त्याच्या बहिणीला दिली. घटनेची फिर्याद नातेवाईकांनी आचरा पोलिसांना दिली याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार सुशांत पुरळकर करत आहेत.
त्यांच्या पश्चात दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.