*येत्या काळात मालवण तालुका हा विकासाभिमुख बनेल डांगमोडे येथे दत्ता सामंत यांचे प्रतिपादन*

*येत्या काळात मालवण तालुका हा विकासाभिमुख बनेल डांगमोडे येथे दत्ता सामंत यांचे प्रतिपादन*

*कोंकण एक्सप्रेस*

*येत्या काळात मालवण तालुका हा विकासाभिमुख बनेल
डांगमोडे येथे दत्ता सामंत यांचे प्रतिपादन*

*मालवण ः प्रफुल्ल देसाई*

मागच्या दहा वर्षांपासून वाहतुकीस धोकादायक बनलेला डांगमोडे बेलाचिवाडी या रस्त्याच्या कामास आता सुरुवात झाली असून या भागातील आमदार बदलल्या नंतर आता हा रस्ता काही महिन्यात पूर्ण होत आहे. गेल्या दहा वर्षात मागील आमदारांमुळे विकासापासून वंचित राहिलेला मालवण कुडाळ हा मतदार संघ आता निलेश राणे हे आमदार बनल्याने विकासाभिमुख बनेल त्यामुळे आगामी काळात याभागातील उर्वरित समस्या पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल असे प्रतिपादन शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी येथे बोलताना केले

मसुरे डांगमोडे येथील श्री देव रवळनाथ मंदिर येथे वार्षिक भवानी देवीचा गोंधळ उत्सवाच्या निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी जी प अध्यक्ष सौ सरोज परब, माजी प स सदस्य सौ. गायत्री ठाकूर, महेश बागवे, वेरली सरपंच धनंजय परब, मालोंड सरपंच पूर्वा फणसगावकर, मसुरे माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, पूजा ठाकूर बाळा आंगणे, दीपक पाटकर, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, माजी उपसभापती छोटू ठाकूर, पत्रकार प्रफुल्ल देसाई,अमित खोत, सुयोग पंडित, दत्तप्रसाद पेडणेकर, नारायण ठाकूर, दीपक पाटकर, गार्गी चव्हाण, पंकज वर्दम आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत पांडुरंग ठाकूर यांनी केले.

यावेळी बोलताना दत्ता सामंत म्हणाले, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पुढील काळात हा गाव विकासात पुढे राहणार आहे. छोटू ठाकूर आणि सहकारी यांनी सुचविलेल्या विकासात्मक बाबी राणे कुटुंबियांच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील. पालकमंत्री नितेश राणे जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत. दिल्लीत खासदार नारायण राणे तर हक्काचा आमदार निलेश राणे यांच्या रूपाने आपल्याला मिळाल्याचे सांगितले

यावेळी नवतरुण मित्रमंडळाच्या वतीने डांगमोडे येथील ज्येष्ठ महिलांचा महिला दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश ठाकूर तर आभार दत्तप्रसाद पेडणेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!