*कोंकण एक्सप्रेस*
*देवगड कॉलेजचा विद्यार्थी तौसिफ शेख याची राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या संघात निवड*
*देवगड ः प्रशांत वाडेकर*
अकोला येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय शालेय गटातून पाँवर लिप्टिंग स्पर्धेमध्ये देवगड मधील श्रीम.न.शां.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत कु. सानिका विजय पुजारे हिने रौप्य पदक प्राप्त केले. कु. श्रेयस राजेंद्र धुवाळी याने कांस्य पदक मिळविले. कु. तौसिफ हनिफ शेख याने सुवर्ण पदक आणि ‘ स्ट्राँग बाँय आँफ महाराष्ट्र ‘ हा किताब पटकावला. कु. तौसिफ शेख याची राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक प्रा. शहाजी गोफणे यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षण विकास मंडळ देवगडच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. शरद शेटे तसेच पर्यवेक्षक प्रा. रमाकांत बांदेकर यांनी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या