मोदी सरकार ने महीलांना आत्मनिर्भर बनविले* —– *भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर*

मोदी सरकार ने महीलांना आत्मनिर्भर बनविले* —– *भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर*

*कोंकण एक्सप्रेस*

*मोदी सरकार ने महीलांना आत्मनिर्भर बनविले* —– *भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर* 

*जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतिने वेंगुर्ले तालुक्यातील १० कर्तृत्ववान महिलांचा सन्मान* 

*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*

महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता येथील भाजप कार्यालयात वेंगुर्ले तालुक्यातील १० कर्तृत्वान महिलांचा सन्मान भाजपा महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व अँड. सुषमा खानोलकर , तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर , महीला ता.अध्यक्षा सुजाता पडवळ , शहर अध्यक्षा श्रेया मयेकर , ता.सरचिटणीस पपु परब , प्रार्थना हळदणकर , साक्षी पेडणेकर , कृपा मोंडकर , आकांक्षा परब , समिधा कुडाळकर , हसीनाबेन मकानदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी मार्गदर्शन करताना महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर म्हणाल्या कि महिलांच्या कामगिरीचा सन्मान आणि लिंग समानतेचा पुरस्कार करण्यासाठी ८ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार करतानाच वेंगुर्ले तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेंगुर्ल्याच्या गौरवात भर घालणाऱ्या निवडक दहा महिलांचा सन्मान करून वेंगुर्ल्यात जागतिक महिला दिन साजरा केल्या बद्दल पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले . तसेच २०१४ पासुन मोदी सरकार आल्यानंतर खऱ्या अर्थांने महीलांना सन्मानाची वागणूक मिळत असल्याचे सांगून , मोदी सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची कामगिरी केल्याचे सांगितले .
यावेळी संगीत अलंकार ही संगीत क्षेत्रातील मानाची पदवी प्राप्त करून आपण मिळविलेले ज्ञान नवीन पिढीपर्यंत हस्तांतरीत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून झटत असलेल्या होडावडे गावच्या रहिवासी सौ. विणा हेमंत दळवी, कोकणचा निसर्ग आणि इकॉनॉमी यांचा उत्तम सांगड घालत काथ्या उद्योगासारख्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कुशेवाडा येथील रहिवासी सौ. रुची राजाराम राऊळ, नाट्य क्षेत्रात १२०० हून अधिक संगीत, सामाजिक, एतिहासिक, पौराणिक नाटकांमध्ये प्रमुख भूमिका साकारणाऱ्या मातोंड गावच्या रहिवासी सौ. मिताली महेंद्र मातोंडकर व फोटोग्राफीसारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या वजराट गावच्या रहिवासी सौ. स्मिता शंकर कासले यांचा सन्मान करण्यात आला .
तसेच दशावतार ही आजपर्यंत पुरुषांचा एकहाती अमंल असलेली लोककला आहे. दशावतारातील संगीत क्षेत्रात कोणी महिला उतरेल याचा विचारही कोणी केला नसेल, मात्र खानोली गावातील भाविका लक्ष्मण खानोलकर या महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या युवतीने पखवाजवादानात कौशल्य प्राप्त करून दशावतारात दमदार प्रवेश केला आहे. दशावतारात पखवाज करणारी ती पहिली व एकमेव महिला ठरली आहे. त्यामुळे तिचाही सन्मान करण्यात आला .
थाई बॉक्सिंगक्षेत्रात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदकाची मानकरी ठरलेली उभादांडा येथील योगा प्रशिक्षक मारिया आशिष अल्मेडा , संगीत क्षेत्रातील शिक्षण घेऊन चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाची जादू दाखविणारी उभादांडा गावची सुकन्या अमृता श्रीकृष्ण पेडणेकर , खर्डेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच मुंबई विद्यापीठस्तरीय विविध अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई करणारी रामघाट वेंगुर्ले येथील गायत्री राजाराम राणे , एमबीएपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेली दाभोली गावची सुकन्या अनुराधा अमृत कुंडेकर व दिव्यांग असूनही दिव्यांग महिलांच्या क्रिकेट स्पर्धेत उल्लेखनीय काम गिरी करणारी सोशल मीडियावर अॅक्टिव असलेली तुळस कुंभारटेंब येथील प्राजक्ता माळकर उर्फ जपा यांचाही सन्मान करण्यात आला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच महिला जिल्हाध्यक्षा श्वेताताई कोरगावकर यांचे स्वागत तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व प्रास्ताविक अँड. सुषमा खानोलकर व आभार प्रदर्शन सुजाता पडवळ हीने केले .
या कार्यक्रमास दिलीप परब , दिगंबर आरोसकर तसेच सत्कार मुर्तींचे कुटुंबीय उपस्थित होते .
भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे सर्व सत्कारमुर्तींनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!