*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणातील महिलांच्या आरोग्य शिबिरात ५६० जणांची तपासणी; २२ जणांनी केले रक्तदान*
*सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, लायन्स क्लब मालवण, सिंधुदुर्ग व पडवे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन*
*मालवण ः प्रतिनिधी*
जागतिक महिला दिन व स्वराज्य ढोल-ताशा पथक वर्धापन दिनानिमित्त सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, स्वराज्य संघटना, सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, मातृत्व आधार फाऊंडेशन, वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर, लायन्स क्लब मालवण सिंधुदुर्ग व पडवे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबीरात ५६० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच यावेळी २२ जणांनी रक्तदान केले.