विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

*कोंकण एक्सप्रेस*

*विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा*

*कणकवली ः प्रतिनिधी “

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल, कणकवली येथे ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात डॉ. संपदा विवेक रेवडेकर (MBBS, DMRE, कन्सल्टिंग रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट) यांचे प्रमुख अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले. डॉ. रेवडेकर यांनी विद्यार्थीनीना जीवन कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास, समतोल, वेळेची पाबंदी, शिस्त आणि संतुलित आहार याबद्दल मौल्यवान मार्गदर्शन दिले.तसेच, प्रा. मेघा बाणे यांनी आपल्या मौल्यवान अनुभव आणि अंतर्दृष्टीसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमात प्रा. मेघा बाणे, सौ. आदिती सावंत, सर्व महिला अध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि महिला विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ. राजेश जगताप, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. चंद्रशेखर बाबर, विभागप्रमुख प्रा. अमर कुलकर्णी आणि डॉ. अमोल उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. स्वरूपा भोकरे आणि प्रा. नेहा गुरव यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका पार पडली. युवक कल्याण संघाचे अध्यक्ष वैभव नाईक, उपाध्यक्ष सौ. स्नेहा नाईक, सचिव डॉ. रमण बाणे आणि व्यवस्थापकीय विश्वस्त प्रा. मंदार सावंत यांनी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजनासाठी विशेष अभिनंदन आणि कौतुक केले.

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये साजरा झालेला आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या विविध क्षेत्रातील योगदानाचे महत्त्व ओळखून आणि सर्व विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा एक खास कार्यक्रम ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!