*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विद्यामंदिर इंग्लिश स्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला . इंग्लिश स्कूलच्या महिला पालक या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित होते . महिला पालकांचे आरोग्य या विषयी डॉ शमिता बिरमोळे मॅडम यांनी महिला पालकांना मार्गदर्शन केले . तसेच बालकांचा संस्कारात्मक विकास करतांना बऱ्याच महिला पालक आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि शारिरीक व्याधी वाढत जातात योग्य वयात शरिराची काळजी घेऊन आहार आणि व्यायाम योगासने केली तरच आपण आरोग्यपूर्ण जीवन जगू शकतो असा सल्ला डॉ बिरमोळे मॅडम यांनी समस्त स्त्रीयांना दिला . विज्ञान शिक्षिका शर्मिला केळूसकर मॅडम यांनी स्त्रियांचे सामाजिक संरक्षण या विषयी मार्गदर्शन केले आज सामाजिक अवस्था बदलत चालली आहे अशा काळात स्त्रियांचे संरक्षण महत्वाचे आहे आपल्या अमोघ वक्तृत्वाने महिलाना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या . पालकांमधूनही मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सर पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सर उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन मुख्याधिका दिव्या सावंत व सहकारी अध्यापकांनी नेटके केले होते संस्कारातून मनोरंजन तसेच आरोग्य आणि सामाजिक संरक्षण या विषयांनचे आयोजन करून जागतिक महिला दिन उत्साहात साजरा झाला .