सरसकट कारवाई न करता लोकांना विश्वासात घ्या, त्यांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची परवानगी द्या

सरसकट कारवाई न करता लोकांना विश्वासात घ्या, त्यांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची परवानगी द्या

*कोकण Express*

*सरसकट कारवाई न करता लोकांना विश्वासात घ्या, त्यांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची परवानगी द्या………….*

*राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांची वीज वितरणकडे मागणी……..*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी* 

सिंधुदुर्गजिल्ह्यातील ग्राहक प्रमाणिक आहेत.त्यामुळे त्यांच्यावर सरसकट कारवाई न करता लोकांना विश्वासात घ्या, त्यांना टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची परवानगी द्या,अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकारी राजेंद्र बुरे यांच्याकडे केली.दरम्यान आम्हाला थकीत ग्राहकांचे मीटर तोडण्याचे आदेश आले आहेत. तरी आम्ही ग्राहकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करू,असे आश्वासन श्री बुरे यांनी दिले.राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांच्या नेतृत्वाखाली श्री बुरे यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!