*कोंकण एक्सप्रेस*
*रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व माधवराव पवार विध्यालय कोकिसरे च्या वतीने महिलादिन साजरा*
*वैभववाडी ः संजय शेळके*
रोटरी क्लब ऑफ वैभववाडी व माधवराव पवार विध्यालय कोकिसरे च्या वतीने महिलादिन साजरा झाला. १५० विद्यार्थिनी,महिलांना मार्गदर्शन व सॅनिटरी पॅड चे वाटप करण्यात आले. रो.डॉ पावसकर मॅडम कणकवली व सौ चेंदवनकर क्लब फूड डिस्ट्रिक कोऑर्डीनेटर सिंधुदुर्ग यांनी मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ वाडीचे प्रेसिडेंट प्रशांत गुळेकर , माधवराव पवार विद्यालयाचे मुख्याध्यापक कदम सर, इतर सहकारी शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या. रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या सदस्या सौ सलोनी टक्के, स्नेहल खांबल, संजना रावराने यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले होते.