*मत्स्य विभागाकडून सकारात्मक निर्णय न घेतल्याने उद्या बुधवारपासून मासेमारी व मासेविक्री बेमुदत काळासाठी बंद

*मत्स्य विभागाकडून सकारात्मक निर्णय न घेतल्याने उद्या बुधवारपासून मासेमारी व मासेविक्री बेमुदत काळासाठी बंद

*कोकण Express*

*मत्स्य विभागाकडून सकारात्मक निर्णय न घेतल्याने उद्या बुधवारपासून मासेमारी व मासेविक्री बेमुदत काळासाठी बंद…….*

*पारंपरिक मच्छीमारांनी छेडलेले साखळी उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच………..*

*मालवण ः प्रतिनिधी* 

बंदीअसूनही सुरू असलेल्या एलईडी पर्ससीन मासेमारीवर तसेच परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सवर मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती सिंधुदुर्गच्यावतीने पारंपरिक मच्छीमारांनी छेडलेले साखळी उपोषण आज पाचव्या दिवशीही सुरूच होते. शासनाने पारंपारिक मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्याने हे आंदोलन उद्या बुधवारपासून तीव्र करण्यात येणार असून मासेमारी व मासेविक्री बेमुदत काळासाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे मच्छीमारांच्यावतीने अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच या आंदोलनात किनारपट्टीवरील पर्यटन व्यावसायिकांनीही मच्छीमारांना साथ देऊन पर्यटन व्यवसाय बंद ठेवावा असे आवाहनही मिथुन मालंडकर यांनी केले आहे. एलईडी लाईट पर्ससीन मासेमारीवर आणि हायस्पीड ट्रॉलर्सवर कारवाई करण्याचा मागणीसाठी पारंपारिक मच्छीमारांनी पारंपारिक मच्छीमारांनी मालवणात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. शासनाने अनधिकृत मासेमारीवरील कारवाई बाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास बुधवार पासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा पारंपारिक मच्छीमारांनी दिला होता. मात्र मत्स्य विभागाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने आज पाचव्या दिवशीही हे साखळी उपोषण सुरू होते.या आंदोलनात राज्याच्या किनारपट्टी वरील पारंपारिक मच्छीमारांनाही सामावून घेऊन महाराष्ट्रभर हे आंदोलन पोहोचवणार आहोत असा इशाराही मिथुन मालंडकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!