*कोंकण एक्सप्रेस*
*मठ हायस्कूल येथे महिला दिन संपन्न*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
मठ येथील डॉ.रा.धों.खानोलकर हायस्कूल येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या शब्दकोशात शब्द शोधून स्पेलिंग लिहिणे स्पर्धेमध्ये प्रथम-दुर्वांका भावडे, द्वितीय-तन्मय होडावडेकर, तृतीय-सुषमा गावडे आणि प्रज्वल धुरी यांनी क्रमांक पटकाविले. तसेच निबंध लेखन स्पर्धाही घेण्यात आली.
तत्पूर्वी मुख्याध्यापक एस.ए.जाधव, शिक्षक गणुराज गोसावी, स्वप्नाली कबळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रिती ठाकूर, सुषमा गावडे व वैदेही परूळेकर या विद्यार्थीनींनी आपले विचार मांडले. यावेळी विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
फोटोओळी – महिला दिन कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले.