*कोंकण एक्सप्रेस*
*महिलांच्या सक्षमीकरणाचे आनंददायी व्यासपीठ, म्हणजे पाककला स्पर्धा ! – संजना आग्रे*
*महिलांच्या अंगीभुत कलेचा आविष्कार या स्पर्धा मधून व्यक्त व्हावा – विभावरी रासम*
*जागतिक महिला दिनानिमित्त, ग्रामपंचायत फोंडा तर्फे पाककला स्पर्धा उत्साहात संपन्न !*
*फोंडाघाट : प्रतिनिधी*
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला, फोंडाघाट ग्रामपंचायतच्या छत्रपती शिवाजी
महाराज सभागृहा त महिलांसाठी खुली पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचा शुभारंभ दिप प्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी फोंडाघाट सरपंच संजना आग्रे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा देताना, महिलांच्या सक्षमीकरणाचे आनंददायी व्यासपीठ असा गौरव केला. परीक्षक विभावरी रासम यांनी महिलांच्या अंगिभूत पाक कलेचा अविष्कार या स्पर्धा मधून व्यक्त होईल, असे सांगून स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
यापैकी यावेळी उपसरपंच तन्वी मोदी, ग्रामपंचायत सदस्य प्राची धुरी, अवंती सावं, प्रीतम भोगले, सायली तेली, राजश्री नानचे, प्रज्ञा सामंत, मनीषा चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग, तसेच स्पर्धेक आणि ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. स्पर्धेचा निकाल उद्या जागतिक महिला दिन सोहळ्यात जाहीर होईल, व त्याच वेळी विजेत्यांना मान्यवरांचे हस्ते गौरविण्यात येईल.