जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक कला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक कला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

कोंकण एक्सप्रेस 

जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक कला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

मालवण : प्रतिनिधि 

मालवण एज्युकेशन सोयायटी संचालित जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूल मालवण येथे शाळेतील विद्यार्थ्यांचे वार्षिक कला व विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन दिनांक ७ ते ८ मार्च या कालावधीत करण्यात आले आहे. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील विविध कलाकृतींची मांडणी या प्रदर्शनात केलेली आहे. स्मरणचित्र, संकल्पचित्र, वस्तुचित्र, अक्षरलेखन, मुक्तहस्त चित्र, व्यक्तिचित्र, प्रिंटमेकिंग, अशा विविध प्रकारांमधील चित्रांचा यात समावेश आहे. तसेच हस्तकलेतील मुलांनी बनवलेल्या विविध कलाकृती या प्रदर्शनात मांडलेल्या आहेत. या प्रदर्शनाचे परीक्षण टोपीवाला हायस्कूल चे कलाशिक्षक बलराम सामंत यांनी केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून अशा विविध उपक्रमांचे आयोजन प्रशालेमार्फत वारंवार करण्यात येते.

तसेच इयत्ता 3 री ते 8 वी मधील विद्यार्थ्यांनी विविध विषयावर विज्ञान प्रतिकृती तयार केल्या होत्या. इको फ्रेंडली, पर्यावरण पूरक, कमी इंधन वापराचे, सौर ऊर्जे वर चालणारे, घरगुती वापराचे असे अनेक छोटे छोटे आणि सोपे प्रयोग या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.

कला व विज्ञान प्रदर्शना साठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका तेजल वेंगुर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेचे शिक्षक निशिकांत पराडकर, स्मिता वायंगणकर, राहुल तारी, अमेय नाईक, स्वाती पाटकर, स्नेहल तोडणकर, हर्षा सावंत, दीपक जाधव यांनी मेहनत घेतली. इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!