कोंकण एक्सप्रेस
आरोपीला न्यायालयीन कोठडी; अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे खून प्रकरण….
कणकवली : प्रतिनिधी
किनळे येथील अंगणवाडी सेविका सुचिता सोपटे हिचा खून प्रकरणातील आरोपी ईतोरीन फर्नांडिस याला कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. या प्रकरणातील तपासात पोलीस निरीक्षक जगताप यांनी न्यायालयाकडे पोलीस कस्टडीची मागणी केली होती. मात्र आरोपीचे वकील अक्षय चिंदरकर यांनी हरकत घेत आठ दिवस आरोपी पोलीस कस्टडीत होता. तपासात चांगले सहकार्य केले. त्यामुळे पोलीस कस्टडी देण्यात येऊ नये अशी विनंती केली. यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणने ऐकुण आरोपी ला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.