एसटी स्टॉप वगळल्याने प्रवाशांचे हाल

एसटी स्टॉप वगळल्याने प्रवाशांचे हाल

कोंकण एक्सप्रेस 

एसटी स्टॉप वगळल्याने प्रवाशांचे हाल

जुना एसटी स्टॅण्ड मार्गे बसेस सुरू करण्याबाबत वेंगुर्ला आगार व्यवस्थापक यांना निवेदन 

वेंगुर्ला प्रतिनिधी  : प्रथमेश गुरव 

जुन्या एसटी स्टॅण्डमार्गे जाणा-या सर्व बसेस पूर्वीप्रमाणे तात्काळ सुरू करण्यात याव्यात अशा आशयाचे निवेदन माजी नगरसेवक श्रेया मयेकर यांच्या नेतृत्वाखाल वेंगुर्ला आगार व्यवस्थपकांना देण्यात आले.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात गॅस पाईप लाईनचे काम सुरू असल्याने जुना एसटी स्टॅण्ड मार्गे जाणा-या बसेस बंद करण्यात आल्या होत्या. परंतु, आता काम संपूनही त्या मार्गे जाणा-या बसेस अद्यापही सुरू करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तेथील नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांचे अतोनात हाल होत आहेत. या सर्वांना एसटीसाठी दाभोली नाका किवा शिरोडा नाका येथे पायी जावे लागत आहे. तसेच दाभोली मार्गे येणा-या गाड्या जुना एसटी स्टॅण्ड येथे उतरणारे प्रवासी असताना सुद्धा संबंधित गाड्या तेथे गाडी जात नाही असे उद्धटपणे सांगून गाडी दाभोली नाक्यावरून सरळ नेली जात आहे. तरी हा प्रकार तात्काळ थांबवून एसटीतर्फे प्रवाशांना चांगल्या सोयी द्याव्यात. तसेच मठ व दाभोली मार्गे जाणा-या व येणा-या सर्व गाड्या जुना एसटी स्टॅण्ड मार्गे सुरू कराव्यात. अन्यथा याबाबत एसटीच्या वरिष्ठ कार्यालयात तक्रार केली जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. या निवेदनावर शुभांगी मांजरेकर, एकनाथ मुळगांवकर, माजी नगरसेवक राजेश कांबळी, दिपक मांजरेकर, युगा मातोंडकर, पौर्णिमा मेस्त्री, मयुर सातोस्कर, किरण मेस्त्री, ऐलेश मांजरेकर, छाया कोचरेकर, टायटस फर्नांडीस, किजमा फर्नांडीस, वेदश्री केळुसकर, श्रीधर मांजरेकर, सुंदर गावडे, रामदास गांवकर, मिनू फर्नाडीस, किशोर आंब्रडकर आदींनी स्वाक्षरी केल्या आहेत. तर वेंगुर्ला आगार व्यवस्थापक यांना निवेदन देताना माजी नगरसेवक श्रेया मयेकर, राजेश कांबळी, नागरिक शुभांगी मांजरेकर व छाया कोचरेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!