18 मार्चला आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार कणकवलीतील रिंगरोड  लोकार्पण

18 मार्चला आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार कणकवलीतील रिंगरोड  लोकार्पण

*कोकण Express*

*18 मार्चला आमदार नितेश राणेंच्या हस्ते होणार कणकवलीतील रिंगरोड  लोकार्पण*

*कणकवली वासियांचे स्वप्न  उतरणार सत्यात*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

शहरातील आचरा रोड ते गांगो मंदिरापर्यंत च्या रिगरोडच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आमदार नितेश राणेंच्या हस्ते 18 मार्च रोजी सकाळी 11 वाजता गांगो मंदिर येथे करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेता संजय कामतेकर, नगरसेवक शिशिर परुळेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे आदी उपस्थित होते.
शहरवासीयांची वर्षानुवर्षांची मागणी असलेल्या रिंगरोड च्या मसुरकर किनई ते गांगो मंदिर दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे सव्वा दोन कोटी निधी खर्चून हा रस्ता बनविण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय निर्देश पाळून लोकार्पण कार्यक्रम करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!