*कोंकण एक्सप्रेस*
*अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी कणकवलीत चौघे ताब्यात…*
“स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई, गांजासह ९० हजाराचा मुद्देमाल जप्त…*
*सिंधुदुर्गनगरी, ता. ०७ः*
कणकवली हरकुळ बुद्रुक येथे अंमली पदार्थाचे सेवन केल्या प्रकरणी चौघांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्या कडून गांजा, अंमली पदार्थ ओढण्यासाठीच्या दोन चिलीम, लायटर, मोबाईल व एक दुचाकी असा ९० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण च्या पथकाकडून करण्यात आली. अकबर नूरमहमद पटेल (रा. हरकुळ-बुद्रुक गावठणवाडी), तुषार रावसाहेब करांडे (रा. कलमठ विडयेवाडी), प्रथमेश गणपत घाडीगांवकर (रा. मठबुद्रुक घाडीवाडी), आणि भुषण मंगेश लाड (रा. भवानी अपार्टमेंट, नाथ पै नगर, ता. कणकवली) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हरकुळ बुद्रुक गावठणवाडी येथे संशयित गांजा सेवन करत असताना आढळून आले. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून गांजा, अंमली पदार्थ सेवन करण्यासाठीच्या दोन चिलीम, लाईटर, मोबाईल व एक दुचाकी असा एकूण ९० हजार रुपयाचा मुद्देमाल आढळून आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक समीर भोसले, रामचंद्र शेळके, पोलीस हवालदार डॉमिनिक डिसोजा, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, किरण देसाई आदींच्या पथकाकडून करण्यात आली.