फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन निमित्त भरगच्च कार्यक्रम

फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन निमित्त भरगच्च कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट ग्रामपंचायतीच्या वतीने 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन निमित्त भरगच्च कार्यक्रम*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत फोंडाघाट यांच्यावतीने शनिवार 8 मार्च रोजी पूर्णानंद भवन येथे विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याची रुपरेषा जाहीर झाली आहे.

7 मार्च 2025 पाककला स्पर्धा वेळी दुपारी 3 वाजता स्थळ ग्रामपंचायत फोंडाघाट येथे आयोजन केले आहे तसेच त्यानंतर. आठ मार्च 2025 दीप प्रज्वलन, बक्षीस समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम वेळ दुपारी 3 वाजता स्थळ पूर्णानंद भवन हॉल येथे एकत्र येत उद्योग करणाऱ्या समुहांचा सत्कार होणार आहे. कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होणार आहे. 25 वर्षांवरील वयोगटातील महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा कार्यक्रम होणार आहे.
स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन फोंडाघाट सरपंच सौ संजना आग्रे , उपसरपंच सौ तन्वी मोदी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!