*कोंकण एक्सप्रेस*
*बांद्यात रविवारी आरोग्य शिबिराचे आयोजन,तपासणी व औषधे मोफत दिली जाणार*
*आयुष,हिंदू एकता मंच व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान यांचे संयुक्त आयोजन*
*बांदा ः प्रतिनिधी*
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान(आयुष मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत स्वायत्त संस्थान), धारगळ, पेडणे, गोवा, हिंदू एकता मंच,बांदा व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या रविवार 9 मार्च 2025 रोजी व्यापारी भुवन,विठ्ठल मंदिर,बांदा येथे सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या शिबिरात हृदयरोग,उच्चरक्तदाब,ऍलजी व दमा,श्वसन विकार,पक्षाघात,नेत्र विकार,त्वचाविकार,लिव्हर व किडनी विकार,हाडाचे व सांध्याचे आजार,वातविकार,मधुमेह,बालरोग,मुळव्याध,पचन, कान-नाक-घसा,स्त्रीरोग,थायरॉईड, गुप्तरोग व अन्य जुनाट विकार यावर उपचार होणार असून तज्ञ डॉक्टरांचा समावेश असणार आहे.शिवाय प्रकृतीप्रमाणे आहार, विहार व योग संदर्भात माहिती देखील देण्यात येणार आहे. या शिबिरात सर्व वयोगटातील रुग्णांची तपासणी होणार आहे.सदर शिबिर हे पूर्णपणे मोफत असून यात तपासणी व औषधे ही देखील पूर्णपणे मोफत दिली जाणार आहेत.तरी बांदा व दशक्रोशीतील ग्रामस्थांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदू एकता मंच,बांदा व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यातर्फे करण्यात आले आहे