कोंकण एक्सप्रेस
कणकवली तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित भव्य हॉलीबॉल स्पर्धा
कणकवली : प्रतिनिधि
येथील एस.एम. हायस्कूल, कणकवली या प्रशालेच्या मैदानावर सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ पुरस्कृत, कणकवली तालुका माध्यमिक अध्यापक संघ आयोजित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठीची जिल्हास्तरीय भव्य हॉलीबॉल स्पर्धा रविवार दि.02/03/ 2025 रोजी उत्साहात संपन्न झाली.यामध्ये जिल्ह्यातील 14 संघांनी उस्फूर्त सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी.एम. नलावडे, कोकण विभाग लोकशाही आघाडी अध्यक्ष सागर पाटील, जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष अजय शिंदे, जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे सचिव विजय मयेकर,जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष सुरेंद्र लांबोरे, महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब उपाध्यक्ष संदीप कदम, सचिन मिरगल रत्नागिरी संपर्क प्रमुख, सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष आदरणीय श्री वामन तर्फे सर ,एस एम.हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जी . एन.बोडके सर, उपमुख्याध्यापक रवीराज प्रधान सर,पर्यवेक्षक श्री.जी. ए .कदम सर ,जिल्हा पतपेढी संचालक मारुती पुजारी सर,शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष कमलेश गोसावी, कास्ट्राईब जिल्हा अध्यक्ष संजय पेंडुरकर, सचिव अभिजीत जाधव, कोल्हापूर विभागीय क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ उपाध्यक्ष मारुती माने ,नारायण माने,माधव यादव,पांडुरंग काळे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्पर्धेचे उद्घाटन कणकवली शिक्षण संस्था कणकवलीचे सचिव डी.एम. नलावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी त्यांनी खेळाडूंना खिलाडीवृत्तीचे महत्त्व सांगून शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे कोकण विभाग लोकशाही आघाडी अध्यक्ष सागर पाटील यांनी खेळातील जिद्द, चिकाटी आणि सांघिक भावना यांचा संघटनेत काम करताना कसा उपयोग होऊ शकतो याचा दाखला देत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या
या स्पर्धेचे विशेष म्हणजे स्पर्धेची सुरुवात महिलांच्या प्रदर्शनीय सामन्याने झाली. मालवण तालुका महिला संघ व विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली महिला संघ यांच्यामध्ये रंगतदार सामना झाला.पुरुषांचा अंतिम सामना तुळसुली हायस्कूल,कुडाळ व साळगाव हायस्कूल, कुडाळ यांच्यामध्ये झाला. यामध्ये स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तुळसुली हायस्कूल कुडाळ, द्वितीय क्रमांक साळगाव हायस्कूल, कुडाळ तर तृतीय क्रमांक एस. एम. हायस्कूल, कणकवली यांनी प्राप्त केला…
सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघ परिवार आयोजित जिल्हा स्तरिय स्काॅलरशिप सराव परिक्षेतील कणकवली तालुका यशस्वी प्रथम तिनं क्रमांकांचे चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले
या स्पर्धेचे पूर्ण नियोजन कणकवली तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष एम.एच. पुजारी व सहकार्यांनी केले होते. त्यांना पूर्ण सहकार्य एस. एम. प्रशाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष अजय शिंदे यांनी केले .सूत्रसंचालन एस. एम. पवार, सहाय्यक शिक्षक एस,एम,हायस्कूल,कणकवली यांनी केले तर आभार जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचे सचिव विजय मयेकर यांनी मानले.