*कोंकण एक्सप्रेस*
*विधानसभा विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचे नाव निश्चित*
*मुंबई*
शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांची विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी नियुक्ती करण्यात यावी, या मागणीचे पत्र आज शिवसेना ठाकरे गटाच्यावतीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आले.
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव निश्चित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढील अडीच वर्ष विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेसने ५ वर्षांसाठी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनामध्ये अडीच – अडीच वर्षांचा फार्मुला ठरण्याची शक्यता आहे.
या बैठकीला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे आदी नेते उपस्थित होते.