*कोंकण एक्स्प्रेस*
*छावा चित्रपटाचे व्हिएफएक्स निर्माते आदित्य बादेकर यांचा आस्था ग्रुपतर्फे सत्कार…*
*मालवण : प्रतिनिधी*
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपटाचे व्हीएफएक्स निर्माते आणि मालवणचे सुपुत्र आदित्य श्रीधर बादेकर यांचा मालवण रेवतळे येथे आस्था ग्रुप मालवणच्या वतीने सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
मालवणचे प्रसिद्ध चित्रकार श्रीधर बादेकर यांचे आदित्य बादेकर हे सुपुत्र असून ते सिनेसृष्टीत व्हिएफएक्स निर्माते म्हणून कार्यरत आहेत. बहुचर्चित छावा चित्रपटासाठी त्यांनी आपल्या टीमसमवेत व्हिएफएक्स सिन साकारले आहेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल आस्था ग्रुपतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. आस्था ग्रुपचे अध्यक्ष उमेश मांजरेकर यांच्या हस्ते बादेकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी आदित्य बांदेकर यांनी छावा चित्रपटाविषयी तसेच त्यातील आपल्या व्हिएफएक्सच्या कामाबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थितांनी बादेकर यांच्या कामगिरीचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौगंधराज बादेकर, भाऊ सामंत, बंटी केनवडेकर, मनोज चव्हाण, श्रीराज बादेकर, निनाद बादेकर, भूषण मेतर आदी उपस्थित होते.