*कोकण Express*
*सावंतवाडीत खासदार राऊतांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम…*
*रुपेश राऊळ; तालुका शिवसेनेच्या माध्यमातून आयोजन…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
तालुक्यात खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस उद्या शिवसेनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.यात कोरोना काळात भरीव कामगिरी केल्याबद्दल तालुक्यातील पोलीस पाटलांचा “कोरोना योद्धा” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे,अशी माहिती तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिली.याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,श्री.राऊत यांचा वाढदिवस तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे.शिवसेनेच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक विभागांमध्ये विविध उपक्रम घेतले जाणार आहेत.दरम्यान यात शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.