*कोंकण एक्सप्रेस*
*परब मराठा समाजातर्फे मुंबईत महिला दिन सोहळा…*
*मालवण : प्रतिनिधी*
परब मराठा समाज मुंबई या संस्थेच्या महिला विभागाच्या वतीने ज्ञाती भगिनींचा “जागतिक महिला दिन” सोहळा शनिवार दि. १५ मार्च रोजी सायंकाळी ५ ते १० या कालावधीत महाजनवाडी, भावसार सभागृह, परेल (पुर्व), मुंबई येथे साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त हळदी कुंकू समारंभ व पाककला स्पर्धा होणार आहे. पाककला स्पर्धेसाठी उपवासाचे पदार्थ हा विषय आहे. तसेच भाज्यांपासून दागिने बनवून आणणे व स्टेजवर परिधान करणे, सर्वांसाठी संगीत खुर्ची तसेच इतर विविध स्पर्धा कार्यक्रमास्थळी होणार आहेत. तसेच विविध क्षेत्रात करीअर केलेल्या दहा महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी परब मराठा ज्ञाती महिलांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन परब मराठा समाज मुंबईचे सरचिटणीस जी. एस. परब (९८२०२९७७४३) व महिला संघटक प्रतीक्षा प्रमोद परब (९८७०३३८४१८) यांनी केले आहे.