*कोंकण एक्सप्रेस*
*मालवणात ८ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर…*
*मालवण : प्रतिनिधी*
जागतिक माहीला दिनाचे औचित्य साधून सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान आणि मातृत्व आधार फाऊंडेशन मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ मार्च रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन सकाळी ९. ३० वाजता मालवण तहसिलदार वर्षा झालटे आणि मालवणच्या पोलिस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्या हस्ते होणार आहे. तरी गरजूनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संतोष लुडबे व सौ. शिल्पा खोत यांनी केले आहे.