सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील एजंटराज संपवा

सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील एजंटराज संपवा

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग आरटीओ कार्यालयातील एजंटराज संपवा…*

*ऍड. तानाजी पालव यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनः सीसीटीव्ही सोबत बायोमेट्रिक प्रणाली बसवण्याची मागणी..*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात एजंटचा मोठा हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे त्याचा त्रास जिल्ह्यातील लोकांना होत आहे. त्यामुळे या कार्यालयातील एजंटराज संपवावे अशी मागणी कुडाळ-हुमरमळा येथील अॅड. तानाजी पालव यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी ९.४५ ची ड्युटी असताना सुद्धा १०.३० वाजल्या शिवाय कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे संबंधितांना सूचना देण्यात यावी, तसेच कार्यालय परिसरात सीसीटिव्ही लावण्यात यावा, तसेच बायोमेट्रिक प्रणाली सुरू करण्यात यावी, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालयाची वेळ ही सकाळी 9:45 मिनिटांची असताना बरेच अधिकारी तसेच कर्मचारी हे सकाळी 10:30 मी. वाजल्याशिवाय कार्यालयात येत नाहीत. संध्याकाळीही कार्यालयीन वेळेपूर्वीच बरेच अधिकारी व कर्मचारी हे घरी गेलेले असतात. त्यामुळे कर्मचारी/अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूचना तसेच कार्यालयाची वेळ दर्शवणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी लावण्याबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे. रविवारच्या सुट्टी नंतर सोमवारी सकाळी जिल्हयाबाहेरील बरेच अधिकारी कर्मचारी हे जवळपास दुपारीच कामावर हजर होतात. (हजेरी बाबत बायोमेट्रिक प्रणाली बंद असल्याने पूर्ण दिवसाची हजेरी लागते) या बाबतीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालयाची वेळ दर्शवणारा फलक कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यास व कर्मचारी यांना वेळेवर कार्यालयात उपस्थित राहण्यास सूचना करण्याबाबत विनंती करूनही त्याबाबत वरिष्ठ अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडून कोणतीही कार्यवाही झालेली दिसून येत नाही. कार्यालयातील अधिकारी कर्मचारी हे सकाळी वेळेवर कार्यालयात हजर न मिळाल्याने मी त्यांचे हालचाल रजिस्टर मागीतले असता ते मला देण्यास 2 ते 3 वेळेस टाळाटाळ केली गेली. तसेच जिल्हाभरातून कार्यालयात कामासाठी येण्याऱ्या लोकांचे नोंदीबाबत अभ्यागत भेट रजिस्टर आढळून येत नाही. जेणेकरून सामान्य माणूस कामासाठी ५-६ वेळा कार्यालयात आलेला हे त्यातून सिद्ध होईल. त्यामुळे तक्रार रजिस्टर, अभ्यागत भेट रजिस्टर, हालचाल रजिस्टर

कार्यालयात सहज उपलब्ध होईल यासाठी आपल्या स्तरावरून कार्यवाही होणे आवश्यक आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालयात बायोमेट्रिक पद्धतीने अधिकारी/कर्मचारी यांची हजेरी लावणारी बंद झालेली प्रणालीची यंत्रणा तत्काळ कार्यन्वित करावी. त्यामुळे अधिकारी/कर्मचारी वेळेत कार्यालयात हजेरी लावतील. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालयात एजंट लोकांचा वावर वाढला असून सदर एजंटांना कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाठबळ असल्याचा संशय येतो. त्यामुळे यापूर्वी कार्यालयात गाड्याच्या रजिस्ट्रेशन बाबत गंभीर बाबी उघड हौऊनही कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात आलेले नाहीत. त्याबाबत केवळ प्रस्ताव पाठविल्याची

कारणे सांगितली जातात. हा सर्व प्रकार कार्यालयात वावरण्याऱ्या एजंटांना खतपाणी घालण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असल्याचा संशय वाटतो. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालयात तातडीने सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करण्याबाबत उपाय योजना करावी.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग कार्यालयात कर्मचारी यांच्या कक्षासहित संपूर्ण कार्यालयात एजंट वावरतांना दिसून येत आहेत. त्यामुळे नेमके कार्यालतील कर्मचारी/अधिकारी कोण व एजंट कोण हे ओळखणेही अवघड झाले आहे. काही एजंट हे क्लास वन अधिकाऱ्यांप्रमाणे कार्यालयात वावरतांना दिसून येतात. त्यामुळे आपणास विनंती आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!