पडवे-माजगाव ते पणतुर्ली रस्त्याचे काम ठप्प..ग्रामस्थांची नाराजी; तात्काळ काम सुरू न केल्यास आंदोलन करणार

पडवे-माजगाव ते पणतुर्ली रस्त्याचे काम ठप्प..ग्रामस्थांची नाराजी; तात्काळ काम सुरू न केल्यास आंदोलन करणार

*कोंकण एक्सप्रेस*

*पडवे-माजगाव ते पणतुर्ली रस्त्याचे काम ठप्प..ग्रामस्थांची नाराजी; तात्काळ काम सुरू न केल्यास आंदोलन करणार…*

*दोडामार्ग ः शुभम गवस*

ठेकेदाराकडे योग्य ते मनुष्यबळ नसल्यामुळे पडवे-माजगाव ते पणतुर्ली या ग्रामसडक निधीतील रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. मात्र याबाबत अधिकारी व लोकप्रतिनिधी गप्पा आहेत. दरम्यान येत्या आठ दिवसात या रस्त्याच्या कामाला सुरुवात करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा, इशारा सामाजिक कार्यकर्ते शिरीष नाईक यांनी ग्रामस्थांच्या माध्यमातून दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार, या कामाला गतवर्षी १३ मार्चला मंजुरी मिळाली होती. आता १२ सप्टेंबर २०२५ ला मुदत संपत आहे. संबंधित रस्त्याचे काम ज्या ठेकेदाराने घेतले त्याने ते पूर्ण केलेले नाही. बरेचसे कामे अर्धवट स्थितीत आहे. कोलझर येथे खडीकरण व माती भरून ठेवली आहे. परंतु एक महिना झाला तरी रस्ता त्याच स्थितीत आहे. त्यामुळे त्याचा फटका तेथील ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. लोकांच्या घरात माती जाऊन त्यांना श्वसनाचे आजार होत आहे. त्याबाबत वारंवार संबंधित विभागाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करुन सुद्धा अधिकारी लक्ष देत नाहीत. ठेकेदार नेमके काम करणार की नाही? याबाबत सांशकता आहे. त्यामुळे हे काम आठ दिवसात सुरु करावे, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा श्री. नाईक यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!