*कोकण Express*
*तालुका परीक्षा समिती व पंचायत समिती कणकवली आयोजित स्कॉलरशिप मार्गदर्शन वर्गाचे खारेपाटण येथे आयोजन*
*खारेपाटण ः प्रतिनिधी*
पंचायत समिती कणकवली व तालुका परीक्षा समिती कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करणयात आलेल्या तळेरे प्रभागस्तरीय नवोदय व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ नुकताच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं. येथे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वन करून करण्यात आला.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सुहास पताडे,खारेपाटण- शेर्पे केद्रप्रमुख सद्गुरू कुबल, कासार्डे केंद्र प्रमुख संजय पवार,खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर ,आदी मान्यवर उपस्थित होते. तर या स्कॉलरशिप वर्गाला मार्गदर्शक म्हणून अमोल भंडारी,राजू गर्जे, जागृती परब,सीताराम परधीये,माधवी बुचडे, दशरथ शिंगारे आदी प्रभागातील शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते.
खारेपाटण केंद्रशाळेच्या वतीने मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गासाठी आलेल्या सर्व मान्यवर शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. खारेपाटण – तळेरे प्रभागातील एकूण ५५ विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन वर्गाचा लाभ घेतला.
“कणकवली पंचायत समिती चे माजी सभापती व विद्यमान सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिक्षक कोविड -१९ च्या काळात सुद्धा आरोग्या बरोबरच शिक्षण क्षेत्रावर सुद्धा भर देऊन चांगले काम करत आहेत.यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील स्पर्धेच्या काळात हे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.” असे भावपूर्ण उदगार खारेपाटण केंद्र शाळा नं.१ चे शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटणकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. तर शिक्षण विस्तार अधीकारी सुहास पताडे,केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल यांनी देखील आपले मनोगत कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केंद्र शाळा नं.१ चे मुख्यध्यापक प्रदीप श्रावणकर यांनी केले.
