‘लोकमान्य’तर्फे महिलांसाठी ९ रोजी लोककला स्पर्धा

‘लोकमान्य’तर्फे महिलांसाठी ९ रोजी लोककला स्पर्धा

कोंकण एक्सप्रेस 

‘लोकमान्य’तर्फे महिलांसाठी ९ रोजी लोककला स्पर्धा

रत्नागिरीतील देसाई बँक्वेट हॉल येथे आयोजन, प्रथम प्रवेश घेणाऱ्या दहा संघांना संधी

रत्नागिरी

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे महिला दिनानिमित्त उन्नती २०२५ जल्लोष अभिजात मराठी भाषेचा या विशेष लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

९ मार्च रोजी शहरातील हॉटेल विवेकच्या देसाई बैंक्वेट हॉल येथे ही स्पर्धा भव्य स्वरुपात पार पडणार आहे.

अभिजात मराठी भाषेचा अविभाज्य भाग असलेल्या पारंपरिक लोककलेला या स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे. बदलत्या काळात लोककला हरवत चालल्याची जाणीव असूनही, ग्रामीण भागात आणि काही प्रमाणात शहरी भागात सण-समारंभांमध्ये या कलांचे
सादरीकरण पाहायला मिळते. विशेषतः महिलांनी या लोकपरंपरेचे जतन करण्यास मोठे योगदान दिले आहे.

या स्पर्धेत पारंपरिक नमन, खेळे, जाखडी, टिपरी नृत्य, शेतकरी नृत्य व गीत, तसेच कोळीगीते यांचे सादरीकरण होणार आहे. प्रबोधन, मनोरंजन, पारंपरिकता आणि सुसंगत सादरीकरण स्पर्धेचे प्रमुख निकष असतील.

प्रथम येणाऱ्या १० संघांना प्रवेश दिला जाईला.

या अनोख्या स्पर्धेच्या माध्यमातून मराठी लोककलांचा उत्सव साजरा होणार असून, जास्तीत जास्त महिला

गटांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

उन्नती २०२५ स्पर्धा महिलांसाठी एक अनोखा मंच ठरणार असून, मराठी संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक सुंदर प्रयत्न ठरणार आहे.

अनामत रक्कम परत मिळणार आहे.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक महिला समूहांनी ५ मार्चपूर्वी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या मारुती मंदिर शाखेत प्रवेश शुल्कासह नावनोंदणी करावी.

रक्कम परत दिली जाईल याची नोंद घ्यावी.

अधिक माहितीसाठी सारिका कुलकर्णी (८४८३९२०५९९), विभा कदम (८०१०४९०१२२) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा रत्नागिरी तालुक्या पुरती मर्यादित आहे.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियम व अटी:
१. सादरीकरणातील गीत हे मराठी भाषेतील असावे.
२. प्रत्येक गटात किमान १० महिला असणे आवश्यक आहे.
३. नृत्य ७ मिनिटांचे सादरीकरण असावे.
४. स्पर्धेसाठी नियोजित केलेले लोककला नृत्यप्रकार शेतकरी नृत्य, कोळीगीते, नमन, टिपरी नृत्य आणि कोकणचे खेळे याप्रकारातील किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही लोककलेचा असावा.
५. सादरीकरण होत असताना स्पर्धेसाठी लावले जाणारे निकष प्रबोधन, मनोरंजन, सादरीकरण,पारंपरिकता, मूळ कलाप्रकाराची जपणूक आदी असतील.
६. सहभागी स्पर्धकसमूह यांना फॉर्म भरणे आणि फॉर्मसाठी अनामत रक्कम भरणे अनिवार्य राहील.
६. स्पर्धेकरिता प्रथम येणाऱ्या १० संघांचीच निवड केली जाईल.
७. स्पर्धेकरिता नावनोंदणीची ५ मार्च ही अंतिम तारीख राहील.
८. १० संघांतून प्रथम ३ क्रमांक काढले जाईल.
९. स्पर्धेकरिता परीक्षक व आयोजकांचा निर्णय अंतिम राहील.
कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक महिलेला भेट वस्तू दिली जाणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!