*कोंकण एक्सप्रेस*
*कवठी खून प्रकरणी करलकर बंधूना 4 दिवसांची पोलीस कोठडी…*
*रविवारी निवती पोलिसांनी केली होती अटक…*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
तालुक्यातील कवठी अन्नशांतवाडीत येथील संदीप उर्फ बाळा दामोदर करलकर (52) खून प्रकरणातील रामचंद्र उर्फ दादा दत्ताराम करलकर (40) व शैलेश दत्ताराम करलकर (43) या दोन सख्या भावांना संशयित आरोपी म्हणून निवती पोलिसांनी रविवारी अटक केली. या दोन्ही संशयितांना सोमवारी कुडाळ येथील न्यायालयात हजर केले असता सहदिवाणी न्यायाधीश पी. आर. डोरे यांनी गुरुवार दि. 6 मार्च पर्यंत म्हणजेच चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
कवठी येथील श्री. करलकर यांच्या काजूच्या बागेत जाऊन संदिप करलकर याने काजू चौरले व वडिलांना व कामगाराला धमकावले, यांचा राग मनात ठेवून करलकर बंधूंनी आपल्या कामगाराला सोबत घेत संदिप करलकर याला घरी जाऊन जाब विचारला. यावेळी झालेल्या झटापटीत संदीप करलकर याला जबर मारहाण झाली होती. त्यानंतर संदीप करलकर त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. याबाबतची फिर्याद संदीप करलकर याचा मुंबईस्थित भाऊ संतोष करलकर याने निवती पोलिस स्थानकात दिली होती. त्यानुसार निवत्ती पोलिसांनी अज्ञाता विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आपली यंत्रणा चौकशीसाठी कामाला लावली होती.