*कोंकण एक्सप्रेस*
*मिळून साऱ्याजणी महिला मंचतर्फे 8 मार्च रोजी कार्यक्रम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जागतिक महिला दिनानिमित्त मिळून साऱ्याजणी महिला मंच यांच्यावतीने शनिवार 8 मार्च रोजी येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे विविध स्पर्धा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याची रुपरेषा जाहीर झाली आहे.
दुपारी 2.30 वा. पाककला स्पर्धा होणार असून स्पर्धकाने चणा डाळीपासून कोणत्याही उवींचा पौष्टिकमूल्य असणारा पदार्थ घरी बनवून आणायचा आहे. त्याचप्रमाणे रेसिपी लिहून आणायची आहे. त्यानंतर एकत्र येत उद्योग करणाऱ्या समुहांचा सत्कार होणार आहे. कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होणार आहे. 25 वर्षांवरील वयोगटातील महिलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, लकी ड्रॉद्वारे कुपनद्वारे भाग्यवान दोन महिलांना आकर्षक भेट देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त मालवणी नाटिका, गायन, नृत्य, एकपात्री नाट्यछटांचे सादरीकरण होणार आहे. आरोग्य विषयक सल्ला देणार कार्यक्रम होणार आहे. स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन साऱ्याजणी महिला मंचतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी मधुरा पालव यांच्याकडे संपर्क साधावा