कोंकण एक्सप्रेस
कुडाळ न.प.च्या माध्यमातून मंजूर झालेल्या विकास कामांची संजय पडते यांच्या हस्ते भूमिपूजन
कुडाळ ः प्रतिनिधी
आज कुडाळ शहरात नगरपंचायतीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध प्रभागातील विकास कामांची भूमिपूजन व उद्धघाटन करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर, माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते, दीपलक्ष्मी पडते, माज़ी जि. प. सदस्य संजय भोगटे, दादा साईल, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, बंटी तुळस्कर, शहरप्रमुख रोहित भोगटे, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, जिल्हा प्रवक्ता रत्नाकर जोशी, नगरसेवक राजीव कुडाळकर, गणेश भोगटे, महिला तालुका प्रमुख सिद्धि शिरसाट, नगरसेविका नयना मांजरेकर, चांदनी कांबळी, श्रुति वर्दम, माजी नगरसेवक राकेश कांदे, बंड्या शिरसाट, चंदन कांबळी, प्रसन्ना गंगावाणे, रेवती राणे, चेतन पडते, राकेश वर्दम, चेतन बांदेकर, अवधूत शिरसाट, राजन जळवी, राजू जळवी, अशोक वर्दम, प्रथमेश वर्दम, जयराम डिगस्कर, दीपक कुडाळकर त्या.. त्या प्रभागातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.