कोंकण एक्सप्रेस
दोडामार्ग शिवसेने तर्फे महिला दिनानिमित्त “महिला जागृती मेळावा व विविध सांस्कृतीक कार्यक्रम…
दोडामार्ग : शुभम गवस
महिला दिनानिमित्त शिवसेना दोडामार्ग तालुक्याच्या वतीने ०९ मार्च रोजी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दोडामार्ग मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच “महिला जागृती मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. सदरचा कार्यक्रम दोडामार्ग मधील महालक्ष्मी हॉल या ठिकाणी दुपारी २:३०वाजता होणार असून या कार्यक्रमात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दोडामार्ग तालुका शिवसेना महिला तालुकाप्रमुख चेतना गडेकर यांनी केले आहे.
. या कार्यक्रमांमध्ये स्वागत गीतासह, फुगडी,समई नृत्य,दिंडी तसेच लहान मुलांचे आणि महिलांचे विविध प्रकारचे नृत्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन सौ. चेतना गडेकर यांनी केले आहे