कोंकण एक्सप्रेस
निसर्ग हा आपला सोबती असून पृथ्वीचे मित्रासारखे जतन करा स्कॉट कफोरा
फोंडाघाट : गणेश इसवलकर
फोंडाघाट महाविद्यालयातील भूगोल विभागाच्या वतीने नुकतेच विशेष अशा भित्तिपत्रिकेचे आयोजन केले होते. विविध प्रकारच्या पर्यावरणातील घटकांच्या छायाचित्रांचे नाविन्यपूर्ण संकलन भित्तिपत्रिकेमध्ये केले होते. यामध्ये प्राणी, पक्षी, शेती, हवामान विषयक उपकरणे, फळे आणि त्यांचे औषधी गुणधर्म, खाणकाम, चहाचे मळे आणि पर्यटन स्थळे अशा घटकांच्या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन स्कॉट कफोरा यांच्या हस्ते, तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन श्री. महेश सावंत, कोकण जिओग्राफर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. शिवराम ठाकूर, गोखले महाविद्यालय कोल्हापूर येथील भूगोल विभाग प्रमुख प्रा. संजयकुमार मेन्सी यांच्या उपस्थित करण्यात आले.
यावेळी स्कॉट कफोरा म्हणाले, एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या पर्यावरणातील जैवविविधतेचे चित्रण असलेल्या भित्तीपत्रिकेचे कौतुक केले. निसर्ग हा आपला सोबती आहे. मित्रासारखे आपण पृथ्वीशी वागलो तर समस्या उद्भवणार नाहीत. निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनात आपल्याला उपयोगी पडतो. मानवाचा सर्वांगीण विकास हा पर्यावरणातील साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. परंतु जर चिरंतन विकास आणि भावी पिढीला उपभोग घेण्यासाठी आज संवर्धन करणे आवश्यक आहे. कला आणि वाणिज्य फोंडाघाट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरंधर नारे यांच्या मार्गदर्शनानुसार भूगोल विभाग प्रमुख प्रा. डॉ. आर. बी. पाटील यांनी या भित्तीपत्रिकेचे आयोजन केले होते.