अणसूर गावात विकास कामांचे मनीष दळवी व सचिन वालावलकर यांच्या हस्ते भूमिपूजन…..

अणसूर गावात विकास कामांचे मनीष दळवी व सचिन वालावलकर यांच्या हस्ते भूमिपूजन…..

कोंकण एक्सप्रेस 

अणसूर गावात विकास कामांचे मनीष दळवी व सचिन वालावलकर यांच्या हस्ते भूमिपूजन…..

वेंगुर्ले, ता. ०१ : प्रतिनिधि 

अणसूर गावातील विविध विकास कामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन समारंभ जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते पार पडला. मंजूर झालेल्या कामांमध्ये वेताळेश्वर मंदिर ते धरमगावडे बस टॉप रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे ४ लाख रुपये, देऊळवाडी स्मशानभूमी बांधणे सुशोभीकरण करणे ८ लाख रुपये, अणसूर धरमगावडे गावडेवाडी ते गोबरेटब रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे १० लाख रुपये आणि श्री देव काळोबा मंदिर रस्ता खडीकरण डांबरी करण करणे १० लाख रुपये मिळून एकूण ३२ लाखांच्या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!