कोंकण एक्सप्रेस
मराठी राजभाषा गौरव दिन जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गवाणे येथे उत्साहात साजरा..
कासार्डे प्रतिनिधी ; संजय भोसले.
विद्यार्थ्यांनी सादर केल्या मराठी साहित्यिकांच्या वेशभूषा,संत जनाबाई,संत मुक्ताई, वि.वा. शिरवाडकर,संत कान्होपात्रा आणि कवी भा. रां.तांबे,बहिणाबाई चौधरी, साने गुरुजी यांच्या बालरूपाने वाहवा मिळवली. काव्यवाचन,ग्रंथ दिंडी ने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला.या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व,मराठी संत वाङमय यांची माहिती मिळाली.तसेच मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेच्या मुख्याध्यापक अमरीन जावेद शेख, लक्ष्मण घोटकर ( उच्च श्रेणी मुख्याध्यापक सोमलेवाडी),पदवीधर शिक्षक सद्गुरू तळेकर यांनी परिश्रम घेतले.