कोंकण एक्सप्रेस
श्रावण येथील नृत्य स्पर्धेत श्रीधर पिंगुळकर आणि नंदिनी बिले विजेते…
परब मित्र मंडळाचे आयोजन…
कुडाळ :- प्रतिनिधि
परब मित्रमंडळ श्रावण (ता. मालवण) (मुंबई) आयोजित जिल्हास्तरीय खुल्या एकेरी नृत्य स्पर्धेत श्रीधर पिंगुळकर पिंगुळी व नंदिनी बिले सावंतवाडी विजेत्या ठरल्या परब मित्र मंडळ श्रावणच्या वतीने महाशिवरात्रीच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच बुधवारी रात्री जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन श्रावण गाव प्रमुख उपसरपंच ग्रामपंचायत दुलाजी परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मान्यवरांचे उपस्थितीत पार पडले. यावेळी अध्यक्ष परब मित्र मंडळ श्रावण वरचीपरबवाडी (मुंबई), चंद्रकांत परब सचिव संतोष परब खजिनदार राजेंद्र परब माजी सरपंच श्रावण, प्रशांत परब, वशिष्ठ परब, चंद्रकांत परब, सुनिल परब, विकास परब, अजय परब, परब मित्रमंडळ, मुंबई-श्रावण (वरची परबवाडी) श्री देव लिंगेश्वर विकास मंडळ, श्रावणचे (खालची परबवाडी) पदाधिकारी ग्रामस्थ स्पर्धक आदी उपस्थित होते.