*कोंकण एक्सप्रेस*
*आमदार निलेश राणे यांच्या हस्ते काळेथर देवली खारभूमी योजना नूतनीकरण कामाचे भूमिपूजन*
*सुमारे सात कोटी निधी मंजूर आ. निलेश राणे यांनी महायुती सरकारचे मानले आभार गतिमान शास्वत विकासातून मालवण कुडाळचा बॅकलॉग भरून काढणार*
*मालवण ः प्रतिनिधी*
महायुती सरकारच्या माध्यमातून मागील अडीज वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा विकासनिधी कोकणाला दिला, आमदार नसतानाही मागणी केलीली सर्व कामे प्राधान्याने मंजूर केली, आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून कोकणाला अधिकाधिक विकासनिधी प्राप्त होत आहे. मागील दहा वर्षात मालवण कुडाळच्या जनतेने भोगले आहे. मात्र आता जनतेला अपेक्षित असलेला विकास शाश्वत स्वरूपात करताना विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी काळेथर देवली येथे बोलताना व्यक्त केले.

