*कोंकण एक्सप्रेस*
*हुमरमळा येथे महाशिवरात्र उत्सव निमित्ताने वैभव मांजरेकर मित्र मंडळ पुरस्कृत संगीत गायनाचा कार्यक्रम*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
ग्रामीण भागातुन संगीत विद्यालयाचे विद्यार्थी उतुंग भरारी घेतात म्हणून महाशिवरात्र उत्सव निमित्ताने शिवश्रुती कार्यक्रम आयोजित करुन वैभव मांजरेकर मित्र मंडळाने एक आदर्श निर्माण केला असे गौरवोद्वार बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांनी काढले
हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने वैभव मांजरेकर मित्र मंडळ पुरस्कृत संगीत गायनाचा कार्यक्रम शिवश्रुती आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन श्री गाळवणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना श्री गाळवणकर म्हणाले रामकृष्ण संगीत विद्यालयात अनेक बाल गायकांना संगीताचे थडे दीले जात असुन अशा कार्यक्रमांनी मुलांना कार्यक्रम करण्याची प्रेरणा मिळते म्हणूनच आयोजक आहेत त्यांचे आभार मानले पाहिजेत असे सांगुन श्री गाळवणकर म्हणाले माझे हुमरमळा गाव असुन या गावात संगीत आणि भजनी कलाकारांची खाण आहे आणि या पुढेही माझ्या गावातील प्रत्येक कलाकारांना आपले सहकार्य लाभेल अशी ग्वाही श्री गाळवणकर यांनी दीली यावेळी मा पंचायत समिती सदस्य अतुल बंगे म्हणाले कि या मंदिरात कार्यक्रम होतात ते भजनी कार्यक्रम यांना प्राधान्य दिले जाते आपण वैभव मांजरेकर यांचे खरोखरच कौतुक करतो दरवर्षी महाशिवरात्र उत्सवानिमित्त अशा बाल कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करुन प्रोत्साहन देत आहेत ही कौतुकास्पद
बाब आहे असे श्री बंगे यांनी सांगितले.
यावेळी श्री देव रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समिती अध्यक्ष तथा सरपंच श्री अमृत देसाई, उद्योजक पंकज देसाई, आयोजक वैभव मांजरेकर, विजय कांबळी, मंदार वालावलकर, विकास माड्ये, हौशी मित्र मंडळाचे मितेश वालावलकर मयुर प्रभु, योगेश गाळवणकर, पपु दळवी, स्नेहल सामंत, प्रकाश परब, शेखर परब, महेश परब, निखिल वालावलकर आदी उपस्थित होते.