*कोंकण एक्सप्रेस*
*भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप यांच्याकडून इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड प्रदान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसविण्यात आला. आजच्या आधुनिक काळात माहिती व तंत्रज्ञानाच्या स्पर्धात्मक युगात जलद गतीने काळानुरूप बदलत्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन गेली ७० वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असताना कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेने विद्यार्थ्यांच्या हिताच्या अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. वाढत्या स्पर्धात्मक युगात जिद्दीने आणि महत्त्वकांक्षी वृत्तीने यशस्वी होणारे विद्यार्थी निर्माण केलेत. डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिले जाणारे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत सहज पोहोचवता येते.विद्यार्थ्यांना अध्ययन करताना विविध संकल्पनांची ओळख नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने जलद गतीने होते. यासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप व कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या आमच्या प्रशालेला आज डिजिटल इंटरॅक्टिव्ह बोर्ड बसवण्यात आला.
भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झारापचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर प्रसाद देवधर साहेब यांना मनःपूर्वक धन्यवाद