*कोंकण एक्सप्रेस*
*वैज्ञानिक दुष्टिकोनातूनच आधुनिकतेची कास धरूया:श्री अजयराज वराडकर*
*कट्टा ः प्रतिनिधी*
आजचा समाज सुसंकृत आहे सामजिक भान असलेला आहे तसाच तो आधुनिक आहे. अश्या सर्व संपन्न बाबी असूनही आज सामजिक समस्या निर्माण होत आहेत या चिंताजनक बाबी असून फक्त आपण आधुनिक होत चाललो आहोत .पण फक्त आधुनिक म्हणून चालणार नाही यासाठी आपणाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करावा लागेल किंबहुना आपल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून आधुनिकतेची कास धरावी लागेल असे उद्गार वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय संयुक्त कट्टा या ठिकाणी संपन्न झालेल्या विज्ञान दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काढले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. रामन यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आला.
या कार्यक्रमा च्या निमित्ताने कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ कट्टा चे अध्यक्ष तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.देवयानी गावडे यांनी प्रशालेतील विज्ञान विभागामार्फत घेतलेल्या उपक्रमातील व तालुका स्तरावरील व जिल्हा स्तरावरील स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करण्यात येणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले. व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या .पर्यवेक्षक श्री.महेश भाट यांनी विज्ञान दिनानिमित कार्यक्रमात विज्ञान विभागामार्फत चाललेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली .या वेळी सर्व शिक्षक – शिक्षिका/ विद्यार्थी/ शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.