माजी पालकमंत्र्यांना लाच ऑफर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी ?

माजी पालकमंत्र्यांना लाच ऑफर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी ?

कोंकण एक्सप्रेस 

माजी पालकमंत्र्यांना लाच ऑफर करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कधी ?

मनसे उपाध्यक्ष कुणाल मांजरेकर यांचा सवाल…

कारवाई न झाल्यास एसीबी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा…

 कुडाळ :प्रतिनिधि 

माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण यांना दहा कोटी रुपये लाच ऑफर करणाऱ्या भ्रष्ट अधीकाऱ्यावर सहा महिने झाले तरी अद्याप पर्यंत एसीबी सिंधुदुर्ग मार्फत कोणतीही कारवाई झालेली नाही. येत्या 15 दिवसात कारवाई न झाल्यास लाचलुचपत विभाग सिंधुदुर्ग यांना जाग आणण्यासाठी कार्यालयासमोर मनसे डोल बजाव तथा घंटा नाद आंदोलन करेल असा इशारा मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी दिला आहे. सदर प्रकरणी सखोल चौकशीअंती कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची एसीबीचे अधीक्षक सिंधुदुर्ग अरुण पवार यांना स्मरण पत्र दिल्याचे श्री. किनळेकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग मधील बड्या अधिकाऱ्याने पालकमंत्री यांना तब्बल दहा कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याची माहिती स्वतः पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दैनिक तरुण भारतला मुलाखतीत दिली. दिलेल्या माहितीनुसार त्या बड्या अधिकाऱ्याने आपण सांगू त्या फाईलवर सह्या केल्यास सर्व खात्यांतर्गत पैसे जमा करून दर महिन्याला दहा कोटी रुपये देण्याचे पालकमंत्री रवींद्र बव्हाण यांच्या समोर मान्य केले. या कृत्यासाठी शिक्षा म्हणून सदर लाच देणारे अधिकाऱ्यास निलंबित करण्याची गरज असताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्याची जिल्ह्याच्या बाहेर बदली केल्याचे देखील स्वतः दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

याच अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेने मार्फत लुचपत विभाग सिंधुदुर्ग यांना सदर प्रकरणी सखोल चौकशी करून भ्रष्ट अधिकाऱ्यांना चाप बसावा याकरिता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना तब्बल दहा कोटी रुपयांची लाच ऑफर देणाऱ्या त्या बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. आज रोजी सदर निवेदनावर केलेल्या कारवाईची माहिती विचारली असता एरवी सतत तीन-तीन वर्षे सत्ताधारीच पक्षासाठी एखाद्या व्यक्तीची कसून चौकशी करणाऱ्या एसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यावर काहीच उत्तर नव्हते. माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण लाच ऑफर प्रकरणी येत्या पंधरा दिवसात सखोल चौकशी करून योग्य ती कठोर कारवाई न झाल्यास लाच लुचपत विभाग सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग यांना जाग आणण्यासाठी मनसेतर्फे डोल बजाव आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!