कोंकण एक्सप्रेस
गोगटे जोगळेकर महाविद्यालयात (स्वायत्त) दि. ०८ मार्च रोजी ‘दीक्षांत समारंभाचे’ आयोजन
रत्नागिरी : प्रतिनिधि
रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे गोगटे जोगळेकर महाविद्यालय स्वायत्त झाल्यानंतर स्वायत्त महाविद्यालयामधून पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयास दि. ३१ मे २०२३ रोजी स्वायत्तता मिळाल्यानंतर मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीकरिता १०९३ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. महाविद्यालयाचा पदवी विभागाचा निकाल ८९.८९% तर पदव्युत्तर विभागाचा निकाल ८५.३१% लागला असून १३० विद्यार्थी ‘ओ’ ग्रेडने उत्तीर्ण झाले आहेत.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) मधून उत्तीर्ण झालेल्या सदर विद्यार्थ्यांच्या पदवीदान समारंभाचे आयोजन शनिवार दि. ०८ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात हा समारंभ संपन्न होणार असून त्यामध्ये पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना प्रतिनिधीक स्वरुपात विद्यापीठाची पदवी मान्यवरांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक विषयामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्याला संस्थेच्यावतीने सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
सबंधित विद्यार्थ्यांनी या समारंभासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले आहे.